Ad will apear here
Next
गांधी विचार परीक्षेचा निकाल जाहीर
रोपळे बुद्रूक : येथील पाटील विद्यालयातील चैताली भोसले हिला पदक व सन्मानपत्र देताना मुख्याध्यापक एस. एम. बागल.सोलापूर : जळगाव येथील गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे घेतलेल्या गांधी विचार संस्कार परिक्षेचा जिल्हास्तरीय निकाल जाहीर झाला असून, यात रोपळे (ता. पंढरपूर) येथील पाटील विद्यालयातील दहावीची विद्यार्थिनी चैताली धोंडीराम भोसले हिने या परिक्षेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला. याबद्दल तिला मुख्याध्यापक एस. एम. बागल यांच्या हस्ते नुकतेच मेडल व प्रमाणपत्र देण्यात आले. या वेळी समन्वयक शिक्षक ए. आर. व्यवहारे यांनाही प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.  

गांधी फाऊंडेशनतर्फे गांधी विचार संस्कार परिक्षा महाराष्ट्र, कर्नाटक, मध्यप्रदेश, गुजरातसह एकूण आठ राज्यांमध्ये यशस्वीरित्या आयोजित केली होती. या परीक्षेत सोलापूर  जिल्ह्यातील मुलींनीच बाजी मारली.  याबाबत रोपळे येथील समन्मयक शिक्षक ए. आर. व्यवहारे यांनी या परिक्षेत आतापर्यंत १० लाख ५९ हजार ७८९ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतल्याचे सांगितले. यात माध्यमिक, उच्च माध्यमिक, वरिष्ठ महाविद्यालय, डीएड व बीएडच्या विद्यार्थ्यांचाही समावेश होता.

समन्वयक ए. आर. व्यवहारे यांना प्रमाणपत्र देताना मुख्याध्यापक एस. एम. बागल.या परिक्षेत जिल्ह्यात वर्गनिहाय प्रथम क्रमांकप्राप्त विद्यार्थी असे : उत्कर्षा पांडुरंग जमदाडे (इयत्ता पाचवी, न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॅलेज आफ सायन्स, भाळवणी), सुहानी सतीश मुंढे (सहावी, म. गांधी विद्यालय, काटेगाव), शुभम हनुमंत सातपुते (सातवी, हनुमान विद्यामंदिर, मरवडे), मधुबाला मारूती बोटे (आठवी, किसान कामगार विद्यालय, उपळाई ठो.), सिध्दी अनिल सरडे (नववी, श्रीमती रमाबाई बाबुलाल सुराणा विद्यालय, चिकलठाण), चैताली धोंडीराम भोसले (दहावी, शिवाजीभाऊ बाबा पाटील विद्यालय, रोपळे बुद्रूक).

द्वितीय क्रमांकप्राप्त विद्यार्थी असे : तन्वी गोरख महाडिक (पाचवी, न्यू इंग्लिश स्कूल, घोटी), साक्षी चंद्रकांत सुतकार (सहावी, शे. मु. व ज. साधना कन्या प्रशाला, बार्शी), स्वाती बिराजदार (सातवी, श्री. पंचाक्षरी माध्य. व उच्च मा. विद्यालय माळकवठे), उर्पिता आबासाहेब व्हळे (आठवी, सिल्व्हर ज्युबिली हायस्कूल, बार्शी), हंसिका मोहन जोशी (नववी, बालाघाट पब्लिक स्कूल, उक्कडगाव), वैभव शिवाजी गायकवाड (दहावी, न्यू इंग्लिश स्कूल, रिधोरे).

तृतीय क्रमांकप्राप्त विद्यार्थी : समृद्धी महादेव नागटिळक (पाचवी, हनुमान विद्या मंदिर, बंकलगी), वल्लभ भारत कारंडे (सहावी, यशवंत विद्यालय, पंढरपूर), राजनंदिनी गायकवाड (सातवी, छत्रपती शिवाजी प्रशाला, सोलापूर), पूजा गजानंद कोरे (आठवी, श्री स्वामी समर्थ प्रशाला, अरळी), ऋषिकेश भोपळे (नववी, जवाहरलाल नेहरू हायस्कूल, सिद्धेवाडी).

या परीक्षेत यश मिळवणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/IZQRBK
 मी बाईट्स ऑफ इंडियाचा नियमीत वाचक आहे . इथे सकारात्मक बातम्या व लेख वाचायला मिळतात . त्यामुळे माझ्या दिवसाची सुरवात चांगली होते . गांधी संस्कार परिक्षेच्या निकालाची सविस्तर बातमी ही तशीच मुलांना उर्जा देणारी आहे . खर तर यात आमच्या मुलांचेही कौतुक झाल्याचा आमाला फारच आनंद वाटतो. बाईट्स ऑफ इंडियाच्या टीमला मनापासून धन्यवाद !
 खूपच छान ऊर्जा देणारी बातमी
 Khup chan
Similar Posts
‘तरुण पिढीने सावित्रीबाईंच्या विचाराचा वारसा जपावा’ सोलापूर : ‘राष्ट्राला विकासाकडे नेण्यासाठी आजच्या तरुण पिढीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा वारसा जपला पाहिजे,’ असे प्रतिपादन सुप्रभात ग्रुपचे सदस्य सूर्यभान चव्हाण यांनी केले.
पाटील विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात सोलापूर : रोपळे (ता. पंढरपूर) येथील श्री. शिवाजीभाऊ बाबा पाटील विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन २२ फेब्रुवारी २०१९ रोजी उत्साहात साजरे करण्यात आले. या वेळी विद्यार्थांनी सादर केलेल्या विविध गुणदर्शन कार्यक्रमाला प्रेक्षकांची उत्स्फूर्त दाद मिळाली.
पाटील विद्यालयात महात्मा फुलेंची पुण्यतिथी साजरी सोलापूर : पंढरपूर तालुक्यातील रोपळे बुद्रुक येथील श्री शिवाजीभाऊ बाबा पाटील विद्यालयात महात्मा ज्योतिबा फुलेंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान एस. बी. राऊत यांनी भूषविले.
पाटील विद्यालयाचा निकाल ८७ टक्के सोलापूर : रोपळे (ता. पंढरपूर) येथील रयत शिक्षण संस्थेच्या पाटील विद्यालयाचा इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल ८७.०७ टक्के लागला. या विद्यालयातील पहिले पाच विद्यार्थी भोसे (क.) केंद्रात चमकले. त्यामुळे या विद्यालयाने गुणवत्तावाढीचे उद्दिष्ट साध्य केले आहे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language